Pune Accident : पुण्यात भरधाव ट्रकने दोन बाईकस्वारांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू
Pune Accident : पुण्यात भरधाव ट्रकने दोन बाईकस्वारांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हे देखील पाहा
Pune Car Accident Case : आरोपीच्या रक्ताचे सँपल्स बदलणाऱ्या ससूनमधील डॉक्टर्स, शिपयाची कसून चौकशी
पुणे अपघातप्रकरणात धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर हे अपघात प्रकरण (Pune Road Accident) सातत्याने उचलून धरणारे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादायक आरोप केले आहेत. कल्याणीनगरमध्ये ज्या रात्री हा अपघात झाला त्या रात्री केवळ ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले, असे धंगेकर यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, यावरुन आता राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
रविंद्र धंगेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा सात दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच ससूनमध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा, आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. असो,हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत. जे आता हळू हळू जगासमोर येईल, असे रविंद्र धंगेकरांनी म्हटले आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
