(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pun Crime News Bopdev Ghat : बोपदेव घाटातील सामुहिक अत्याचार प्रकरणी सीसीटीव्ही समोर
पुणे: पुण्याच्या जवळ असलेल्या बोपदेव घाटामध्ये दोन दिवसांपुर्वी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. 3 ऑक्टोबर रोजी तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता याप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली होती. बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याचा प्रकार घडला आहे. त्या तिघांनी फिरण्यासाठी आलेल्या त्या मुलाला आणि मुलीली धमकावलं. त्यांनी या मुलाला त्याच्याच कपडे काढून, त्याला झाडाला बांधून ठेवलं. त्यानंतर तिघांनी मुलीवर अत्याचार केले. या घटनेतील संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तब्बल तीस तास उलटून गेले तरी पोलिसांना अजूनही आरोपींचा कुठलाही मागमूस लागत नाही. शहर पोलिसांच्या तब्ब्ल 25 टीम वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली आहे. बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असले असावेत असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.