Pimpri Chinchwad Sambhaji Maharaj Statue : छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याला तडा ?
Pimpri Chinchwad Sambhaji Maharaj Statue : छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याला तडा ?
पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल शंभर फुटी ब्रॉन्झचा पुतळा (Chhatrapati Sambhaji Maharaj statue) उभारण्यात येत आहे, मात्र तो उभारण्यापूर्वीच महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला तडा गेल्याचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या फोटोवरून सध्या उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने जानेवारी 2020ला छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्याच्या कामाला मंजुरी दिली होती. यासाठी तब्बल 47 कोटी रूपये खर्च केला जाणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हा पुतळा दिल्लीत साकारत आहेत. दिल्लीत पुतळ्याचे तयार झालेले काही पार्ट पिंपरीत दाखल झालेत. तर उर्वरित पार्ट येणं अद्याप बाकी आहे. हे सगळे पार्ट जोडून छत्रपती संभाजी महाराजांच्या शंभर फुटी पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे. यासाठी मोशीतील आंतराराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रालगतच्या जागेची अंतिम निवड करण्यात आली आहे.
मात्र तत्पूर्वीच पुतळ्याच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj statue) पायाला तडा गेल्याचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे, त्यामुळं हे काम निकृष्ठ दर्जाचं आहे का? यात हलगर्जीपणा होतोय का? असे प्रश्न उपस्थित केले जातायेत. हेच प्रश्न पालिकेला विचारले असता, आत्ताच तसा निष्कर्ष काढणं चुकीचं राहील असा खुलासा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात पुतळ्याच्या उभारणीला 2025 उजाडेल, अद्याप ही बरंच काम शिल्लक आहे. असं स्पष्टीकरण पालिकेने दिलं आहे. याबाबत बोलताना पिंपरी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले, ही बातमी अतिशय चुकीची आहे. पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करणार आहोत. जवळपास एक ते दिड वर्षांपासून त्याचं काम सुरू आहे. माझी सर्वांना विनंती आहे. असा चुकीच्या बातम्या पसरत आहेत, त्याच्यावर लक्ष देऊ नका. सद्यस्थितीत पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू नाहीये, त्यांच्या वेगवेगळ्या पार्टची निर्मीती होत आहे. सर्व पार्टची निर्मीती झाल्यानंर आपण पुतळ्याची उभारणी करणार आहोत, असंही यावेळी ते म्हणाले आहेत.