Threat Call Pune : महेश लांडगे, नगरसेवक अविनाश बागवे आणि वसंत मोरेंना एकाच तरुणाकडून धमकी
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकीचे फोन करुन खंडणीची मागणी केली जातेय... यामध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नेते वसंत मोरे यांचा समावेश आहे... या धमकीच्या प्रकरणात मोठी माहिती समोर आलीये.. या तिनही राजकीय नेत्यांना एकाच व्यक्तीने फोन करुन धमकी दिल्याचं समोर आलंय.. एकतर्फी प्रेमातून मुलीला धडा शिकवण्यासाठी या तरुणाने मुलीच्या नावे नेत्यांना धमकी दिल्याचं समोर आलंय.. वसंत मोरेंना धमकी दिल्याप्रकरणी या तरुणाला अटक करण्यात आली होती... पण त्याची जामिनावर सुटका झाली.. मात्र सुटकेनंतरही त्याने आपले प्रताप सुरुच ठेवले आणि अविनाश बागवे आणि महेश लांडगे यांनी धमकी दिली.. त्याप्रकरणी पुन्हा या तरुणाला अटक करण्यात आलीये..























