'तुझा मास्क कुठाय, उचलायला सांगू का पोलिसांना', अजित पवारांनी कॅमेरामनला खडसावलं
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचे भाषण काही वेळा अस्सल ग्रामीण भाषेतील विनोदाची खाण असते. भाषणात बोलता-बोलता अजित पवार अनेकांची फिरकी घेतात. त्यामुळे सहाजिकच विनोद निर्माण होतो. तर कधी कधी मिश्किलपणे ते एखाद्याची कानउघाडणी देखील करतात. सहकार व पणन मंडळाच्या बारामतीतील कार्यक्रमात असाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्किलपणा दिसून आला.
कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणचा वेग वाढवला जात आहे. लवकरात लवकर लसीकरण व्हावे यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. त्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे पालन करा, असे सांगितले. नेमके याच वेळी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनचा मास्क हनुवटीवर असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. ‘अरे मी काय सांगतो. तुझा मास्क कुठाय. तुझ्यामुळे शेजारी असणाऱ्याला कोरोना व्हायचा. उचलायला सांगू का पोलिसांना’ अशा शब्दात कानउघाडणी केली. यावर कार्यक्रमस्थळी हशा देखील पिकला.
![Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4a445057d0dde54a120ac85ab5ec8e461739266511456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/93824e1273ba1cac78f690debb6fea051739242747201718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)