(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Auto Rikshaw Tow Mercedes : पुण्यात इंधन संपलेल्या Mercedes कारला रिक्षानं दिला धक्का | VIRAL
गाडीतील इंधन अचानक रस्त्यावर संपल्यावर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडते. त्यात जर पेट्रोल पंप जवळ नसेल तर मग विचारायलाचं नको. तसंच रस्त्यावर आजूबाजूला प्रत्येकजण घाईत असतो त्यामुळे त्यांच्याकडुन मदतीची अपेक्षा मिळणे देखील कठीण असते. मात्र पुणे याला अपवाद आहे. जे कुठेच पाहायला मिळणार नाही ते पुण्यात मात्र नक्की पाहायला मिळेल. सध्या पुण्यातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एक मर्सिडीज कारला चक्क रिक्षेची मदत घ्यावी लागली.पुण्यातील कोरेगाव पार्क येथील हा व्हिडीओ आहे. पुण्यातील एका रिक्षाचालकाने इंधन संपत आलेल्या मर्सिडीजची मदत केली आहे. खरं तर एक आलिशान मर्सिडीज कार इंधन संपल्याने भररस्त्यातच बंद पडली. मात्र एका रिक्षाचालकाने ही मर्सिडीज थांबू दिली नाही. त्याने हाताने रिक्षेचं स्टेअरिंग धरत रिक्षा चालू ठेवली तर त्याचवेळी जवळील मर्सिडीजला पायाने धक्का दिला त्यामुळे बंद पडलेली मर्सिडीज रस्त्यावर धावू लागली.