एक्स्प्लोर
GOA Election : 2022 मध्ये गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता? आप, टीएमसी, शिवसेनेला लढत कशी देणार?
गोवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत अखेरच्या क्षणाला फिरलेल्या गणितांनंतर भाजप सत्तेत आलं. गेल्या पाच वर्षात मोठी राजकीय गणितं फिरली. मनोहर पर्रिकर यांच्या जाण्यानं गोवा भाजपमध्ये मोठा खड्डा पडला. अशातच आता गोव्याला पुन्हा निवडणुकीचे वेध लागले आहेत. 2022 सालच्या निवडणुकीसाठी गोवा भाजप कसं तयार आहे. विविध योजनांचा परिणाम दिसेल का, महाराष्ट्र गोमंतक सोबत युती होणार का, नाराज मंत्र्यांचं काय, आयारामांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार अशा अनेक प्रश्नांवर आम्ही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना बोलतं केल.
आणखी पाहा


















