(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supreme Court Hearing Live : सुप्रीम कोर्टात आतापर्यंच काय घडलं? 7 न्यायमुर्तींकडे प्रकरण जाणार नाही
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत 2016 च्या नबाम रेबिया प्रकरणाच्या पुनर्विचाराची गरज वाटली तर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे जाईल.. जर कोर्टाने या निकालाच्या पुनर्विचाराची गरज नाही असं म्हटलं तर ही सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुरू राहील.. अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस प्रलंबित असेल तर ते आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय करू शकत नाहीत असा 2016 चा नबाम रेबिया प्रकरणाचा निकाल आहे.. त्याच आधारावर महाराष्ट्रात जूनमध्ये जेव्हा सत्तांतराचं नाट्य घडत होतं, त्यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली गेलेली होती... त्यामुळे त्यांना आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार नाही, असा शिंदे गटाचा दावा आहे... गेले तीन दिवस सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर याबाबत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले आहेत. त्यानंतर आता आज काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.