Sunil Shelke On ShriRang Barne : सत्तांतराचा फटका लोकसभेत बसला, सुनील शेळकेंचं बारणेंना प्रत्युत्तर
महायुतीचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणेंबाबत मावळ विधानसभेत नाराजीचा सूर होता. बारणेंचे मताधिक्य घटण्यामागे हे एक प्रमुख कारण होतं. असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी केला आहे. शंभर टक्के माझा प्रचार केला नाही, असा ठपका अजित पवार गटावर बारणेंनी ठेवला होता. तर निकालानंतर तर राज्यातील सत्तांतरावेळी घडलेल्या घडामोडींचा मला फटका बसला, असं म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाचा महायुतीतील प्रवेशावर बारणेंनी भाष्य केलं होतं. याला अनुसरून ही शेळकेंनी उत्तर दिलं. विधानसभेपर्यंत महायुती टिकेल, अशी प्रार्थना आज ही देवाकडे करताय का? मावळ विधानसभेत मताधिक्य घटलं, नेमकी माशी कुठं शिंकली? दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल करणारे नेमके कोण? यावर शेळकेंनी खुलासा केला. त्यांच्याशी बातचीत केलीये नाजिम मुल्ला यांनी.
हे देखील वाचा
Ashadhi Wari 2024 : गेल्या वर्षीच्या वारकरी-पोलिसांमधील झटापटीमुळे मोठा निर्णय; यंदा आषाढी वारीत पालखी प्रस्थानाला मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीला (Ashadhi Wari 2024) मागील वर्षी वारकरी आणि पोलिसांत झालेल्या झटापटीमुळे यंदा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी माऊलींच्या पालखी प्रस्थानाला मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात प्रति दिंडी नव्वद वारकऱ्यांना प्रवेश देण्याचं निश्चित झालं आहे.
गेल्या वर्षी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आळंदीत आज जिल्हा न्यायाधीश महिंद्र महाजनांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला वारकरी संप्रदायातील प्रमुख व्यक्ती, दिंडी मालक-चालक यांसह पोलीस आणि प्रशासन उपस्थित होते.