Kumar Ketkar : Manmohan Singh यांचं 'अर्थ'सूत्र काय होतं? कुमार केतकरांनी सविस्तर सांगितलं
Kumar Ketkar : Manmohan Singh यांचं 'अर्थ'सूत्र काय होतं? कुमार केतकरांनी सविस्तर सांगितलं
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh Passed Away) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (28 डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहेत. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी भारताला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी देशातील गोरगरीब, दीनदुबळ्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, मनमोहन यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. मनमोहन सिंग पतंप्रधान असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे माजी आयपीएस अधिकारी असीम अरूण यांनी त्यांची एक खास आठवण सांगितली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला मनमोहन सिंग यांचा अभिमान वाटेल अशीच ही आठवण आहे.
असीम अरुण यांनी सांगितली आठवण
असीम अरूण हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते उत्तर प्रदेशच्या समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्री आहेत. आयपीएस अधिकार असताना 2004 साली ते तीन वर्षे मनमोहन सिंग यांचे अंगरक्षक होते. विशेष म्हणजे ते मनमोहन सिंग यांच्या सर्वाधिक जवळ असायचे. त्यांनीच एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट करून मनमोहन सिंग यांची एक जुनी आठवण सांगितली आहे. सोबत त्यांनी मनमोहन सिंग यांचा एक फोटोदेकील शेअर केला आहे.
असीम अरुण यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे.
"मी 2004 साली साधारण तीन वर्षे मनमोहन सिंग यांचा अंगरक्षक होतो. पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षा व्यवस्थेत क्लोज प्रोटेक्शन टीम असते. ही टीम पंतप्रधानांच्या सर्वात जवळ असते. याच टीमचे नेतृत्त्व करण्याची संधी मला मळाली होती. या टीममध्ये एआयजी सीपीटी अशी एक व्यक्ती असते जी पंतप्रधानांच्या नेहमी सोबत असते. ही व्यक्ती पंतप्रधानांपासून कधीच दूर जाऊ शकत नाही. जेव्हा-जेव्हा पंतप्रधानांसोबत एकच अंगरक्षक असतो, तेव्हा याच व्यक्तीला त्यांच्यासोबत जाता येते. ही जबाबदारी माझ्यावर होती," अशी माहिती असीम अरुण यांनी दिली.