Prabhadevi Shivsena Rada : प्रभादेवीत गणपती मिरवणुकीच्या राडा, २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा
मध्यरात्री सुरू झालेल्या राड्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पडदा पडला. पोलीस चौकशीनंतर सरवणकर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनबाहेर पडले. राड्याच्या घटनेमुळे प्रभादेवीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्याची पोस्ट शिंदे गटातल्या संतोष तेलवणे यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर टाकल्यामुळे काल रात्री प्रभादेवीत पुन्हा दोन्ही गटांमध्ये राडा झाला.. यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. मुंबईत प्रभादेवीत गणपती मिरवणुकीत झालेल्या वादानंतर काल शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केलीय. तर २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवलाय.






















