Sanjay Raut on Eknath Shinde : कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला, राऊतांनी शिंदे गटाला डिवचलं
Sanjay Raut on Eknath Shinde : कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला, राऊतांनी शिंदे गटाला डिवचलं
आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळीत आले खरे... त्यांचा या ठिकाणी जाहीर नागरी सत्कारही झाला... मात्र या कार्यक्रमाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं सांगत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आणि शिंदे गटाला डिवसचलंय.... खरंतर आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर शिंदे गट आणि भाजप इथे जोरदार शक्तीप्रदर्शन करेल असं वाटत होतं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.. यावरुनच आता शिवसेनेनं जोरदार टीका केलीय... संजय राऊत यांनीही याबाबत ट्विट करून मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलंय... तर आदित्य ठाकरेंनी देखील यावरुन टोला लगावलाय...




















