एक्स्प्लोर

Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी सादर केली.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. सध्या सुरु असलेली एसआयआर प्रक्रिया आणि कराड दक्षिण (Karad South) विधानसभा मतदारसंघातील दुबार नावांसदर्भात भूमिका मांडली.  कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार नावं दुबार आढळली आहेत, त्याची यादी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती. त्यापैकी 48 हजार मतं वगळली गेली आहेत. निवडणुकीपूर्वी पूर्वी ती काढली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  

कराड दक्षिणमध्ये 58 हजार नावं दुबार

पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदार यादीतील दुबार नावांच्या मुद्यावर बोलताना म्हटलं की,  कराडला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एसआयआरची मोहीम चाललेली आहे.2024 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल मला बोलायचं आहे. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा दारूण पराभव झाल्यानंतर पाचच महिन्यामध्ये विधानसभेमध्ये एवढा मोठा फेरफार कसा झाला, याचं उदाहरण मी आपल्यासमोर मांडणार आहे. माझ्या मतदार संघामध्ये जेव्हा संगणकांनी माझ्या 2024 च्या एकूण मतदार याद्यांची माहिती घेतली. त्यावेळेला माझ्या तीन लाख पंधरा हजार मतदानापैकी एकूण 58 हजार नावं दुबार होती. यापैकी 27 हजार नावं माझ्या मतदारसंघामध्येच दुबार होती, असं पृथ्वीराज च्वाहण यांनी म्हटलं. 

मतदारांनी दोनदा, तीनदा मतदान केलं असल्यास निवडणूक प्रभावित

माझ्या मतदारसघाला पाच मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या संलग्न आहेत. उत्तर कराड बाळासाहेब पाटील, इस्लामपूर जयंत पाटील, पलूस कडेगाव विश्वजीत कदम, पाटण शंभूराज देसाई आणि शिराळा सत्यजीत देशमुख पाचही मतदारसघांमध्ये 6,7,9 हजार मतं म्हणजेच एकूण 28 हजार मतं सामायिक आहेत, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.  माझ्या मतदारसंघातली 27000 च्या जवळपास दुबार मतं आणि शेजारच्या पाच मतदार संघातील जवळजवळ 27 ते 28 हजार मतं अशी एकूण 56,000 मतं ही माझ्या विधानसभेमध्ये दुबार मतं आहेत.त्या मतदारांनी दोनदा, तीनदा, पाचदा, 10 वेळा मतदान केल असेल तर निवडणूक प्रभावित होऊ शकते, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

 दुबार नावांची सगळी यादी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे, त्यांनी ती स्वीकारलेली आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. निवडणुकीपूर्वी आम्ही लेखी निवेदन दिले होते, कारण वेबसाईट काही चालत नव्हती. तिथे काही झालं नाही ती यादी जशीच्या जशी राहिली आणि लोकांनी दुबार मतदान केलं. कोणी कोणी दुबार मतदान केल ते मला माहित नाही ते निवडणूक आयोगाकडे ती माहिती आहे. पण मी 56 हजार नावांची दोन्ही डुप्लिकेट नावं कशी आहेत ती सर्व यादी लेखी आणि सॉफ्ट कॉपी मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. एसआयआरमध्ये त्यापैकी 48 हजार नावं वगळण्यात आली आहेत, ती नावं निवडणुकीपूर्वी वगळली असती तर कदाचित निकाल वेगळा दिसला असता, असंही चव्हाण यांनी म्हटलं. 

अमित शाहांच्या बैठकीचा दाखला

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अमित शाह नागपूरला गेले होते. त्यावेळी अमित शाह यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना 10 टक्के मतं वाढवा असं सांगितलं होतं, याच्या बातम्या छापून आल्या आहेत. पाच महिन्यात 10 टक्के मतदार वाढवण्यात आले. अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं कुणी नाव नोंदवायला आलं तर कुणीही आक्षेप घेऊ नये, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget