
Pankja Munde on Sharad Pawar : शरद पवार मोठे नेते,त्यांची भूमिका महत्वाची :पंकजा मुंडें
Pankaja Munde: विधानपरिषद निवडणुकीच्या (VidhanParishad Election) शपथविधीनंतर आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) पहिल्यांदाच बीडमध्ये जाणार आहेत. दरम्यान राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राज्यातील वंचित बाबत मी स्ट्रॉंग भूमिका घेईन यात वाद नसल्याचे आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापल्याचे दिसत असताना मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) जातीयवाद थांबवावा अशी टीका केली होती त्यावर माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार असे म्हणत मुद्दा काय आहे तिथे बोलले पाहिजे कोणी काहीही बोलेल त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही असे म्हणत त्यांनी मनोज जरांगेना टोलावले.
2019 विधानसभा आणि 2024 लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर विधान परिषदेत पंकजा मुंडे आमदार झाल्या आहेत. दरम्यान काल विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा शपथविधी झाल्यानंतर आज त्या बीडमध्ये जाणार आहेत. यावेळी सावरगाव भगवान भक्ती गडावर जाणार असून, गोपीनाथ गडासह परळीतील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे दर्शन घेतील असेही त्यांनी सांगितले. लोकसभेनंतर माझा पहिला दौरा असून मला सत्कार सोहळे फारसे मान्य नाहीत. आपलं सरकार आणण्यासाठी आम्हाला कामाला लागायचं आहे, असेही त्या म्हणाल्या.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
