Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची शासकीय निवासस्थानासाठी धडपड
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी आतापर्यंत दहा स्मरणपत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविली आहेत. तरीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाकडून मान्यता मिळाली नसल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची अवस्था ‘कोणी घर देता का घर’ अशी झाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी असताना असलेला ‘देवगिरी’ बंगला खास बाब म्हणून देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवार यांचे स्नेहसंबंध असल्याने हा बंगला त्यांना मंजूर करण्यात आल्याची चर्चा होती. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे यांना मात्र शासकीय निवासस्थानासाठी धडपड करावी लागत आहे




















