एक्स्प्लोर

Amravati Municipal Corporation Election : अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Amravati Municipal Corporation Election 2026 : अमरावती महापालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सामना होणार आहे.

Amravati Municipal Corporation Election 2026 अमरावती : महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. या महापालिकांमध्ये विदर्भातील प्रमुख महापालिका असलेल्या अमरावती महापालिकेचा देखील समावेश आहे. अमरावती महानगरपालिकेची शेवटची निवडणूक 2017 मध्ये पार पडली होती. त्या निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतर गेल्या तीन वर्षांच्या काळात अमरावती महापालिकेत प्रशासकांतर्फे कारभार चालवला जात होता. आता अमरावती महापालिकेला लोकशाही पद्धतीनं मतदारांनी निवडलेले लोकप्रतिनिधी मिळणार आहेत. अमरावती महापालिकेसाठी मतदान 15 जानेवारीला होणार आहे. तर, मतमोजणी 16 जानेवारीला होणार आहे.

Amravati Municipal Corporation : अमरावती महापालिका निवडणुकीसंदर्भातील आकडेवारी

अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 22 वॉर्डमधील 87 सदस्यांच्या निवडीसाठी होईल. या महापालिका निवडणुकीसाठी 677180 मतदार मतदान करतील. येथील महिला मतदारांची संख्या 337935 इतकी आहे. तर पुरुष मतदारांची संख्या 339177 इतकी आहे. तर, तृतीयपंथी मतदारांची संख्या 68 इतकी आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी 877 केंद्रांवर मतदान होईल. या 87 जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 15 जागा राखीव आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 जागांवर आरक्षण आहे. तर, ओबीसी प्रवर्गासाठी 23 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 47 जागा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवल्या गेलेल्या असल्यानं 87 च्या 50 टक्के म्हणजे जवळपास 43 ते 44 जागांवर महिला लोकप्रतिनिधी महापालिकेचा कारभार पाहणार आहेत.

स्थापना आणि इतिहास

अमरावती महानगरपालिका ही विदर्भातील एक महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शहराच्या नियोजित विकासात या संस्थेचा मोठा वाटा आहे. अमरावती महानगरपालिकेची स्थापना 15 ऑगस्ट 1983 रोजी झाली. महानगरपालिका होण्यापूर्वी येथे 'नगरपरिषद' अस्तित्वात होती.शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन तिचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले. अमरावती महानगरपालिके अंतर्गत अमरावती आणी बडनेरा अशी दोन शहरं येतात.

​पहिले महापौर  

अमरावती महानगरपालिकेची स्थापना जरी 1983 साली झाली तरी पहिली सार्वत्रिक निवडणूक होण्यासाठी 1992 सालापर्यंत वाट बघावी लागली. 1991 - 92 मध्ये अमरावती महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देविसिंह शेखावत यांना पहिले महापौर होण्याचा मान मिळाला.

​अगदी सुरुवातीच्या काळात स्थापनेवेळी नगरसेवकांची संख्या साधारण 60 ते 70 च्या दरम्यान होती. ​मात्र महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या ही शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. त्यानुसार मागील 2017 च्या निवडणुकीत 87 निवडणूक लढवून आणी 5 स्वीकृत असे एकूण 92 नगरसेवक सभागृहात पोहचले होते.

अमरावती महापालिकेचा 2017 चा निवडणूक निकाल

भाजपनं 2017 च्या अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला होता. भाजपचे 45 नगरसेवक त्यावेळी विजयी झाले होते. काँग्रेसनं 15 जागांवर विजय मिळवला होता. शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळाला होता. विशेष बाब म्हणजे अमरावतीत गेल्या निवडणुकीत असदुद्दीनं ओवैसी यांच्या एमआयएमचे 10 नगरसेवक विजयी झाले होते. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचे 5 नगरसेवक विजयी झाले होते. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचे 3 नगरसेवक विजयी झाले होते. आरपीआय आठवले गटाला एका जागेवर तर एक अपक्ष विजयी झाला होता. 2017 ला भाजपनं निवडणूक जिंकल्यानंतर चेतन गावंडे महापौर झाले होते.

अमरावतीच्या महापालिका निवडणुकीत खालील मुद्दे नेहमीच केंद्रस्थानी असतात:

​1) रस्ते आणि खड्डे: शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत वस्त्यांमधील रस्त्यांची दुरवस्था हा सर्वात मोठा प्रचाराचा मुद्दा असतो.

​2) पाणीपुरवठा: शहराला होणारा पाणीपुरवठा आणि त्याचे नियोजन, विशेषतः उन्हाळ्यातील टंचाई.

​3) कचरा व्यवस्थापन: कचरा डेपोचा प्रश्न, सुका आणि ओला कचरा वर्गीकरण आणि 'स्वच्छ भारत अभियाना'तील शहराचे रँकिंग.

4) अतिक्रमण: शहरातील मुख्य बाजारपेठांमधील अतिक्रमणाचा प्रश्न जो वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतो.

​5) स्मार्ट सिटी प्रकल्प: अमरावती शहराचा 'स्मार्ट सिटी'मध्ये समावेश झाल्यापासून, त्या अंतर्गत होणारी कामे आणि त्यांचा दर्जा हा चर्चेचा विषय असतो.

​6) आरोग्य सुविधा: महानगरपालिकेच्या दवाखान्यांची स्थिती आणि सामान्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा.

2017 ते 2022 या काळात सत्ताधाऱ्यांची चांगली कामे आणि आरोप...

चांगली कामे

1) घनकचरा व्यवस्थापन.. बायोमाइनिंग..

2) प्रधानमंत्री आवास योजना...

3) स्वछता.. कुठल्याही ठिकाणी आधी तक्रार निवारण केंद्र नव्हतं.. सत्ताधाऱ्यांनी प्रभाग निहाय केलं..

4) महानगरपालिका शाळेत 112 क्लास रूम ह्या डिजिटल केल्या..

5) महिलांसाठी रोजगार मिळावं यासाठी प्रशिक्षण देणं सुरू केलं.. आधी संख्या खूप कमी होती नंतर खूप वाढली..

आरोप मुळे चर्चेत असलेली कामे

1) अमरावती शहरात आजही पब्लिक टॉयलेट नाही.. खास करून महिलांसाठी तर कुठंच नाही.. महानगरपालिकाने अंदाजे दीड कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक टॉयलेट उभारले पण अद्यापही ते सुरू झाले नाही...

2) प्रशासक राजमध्ये कमिशन पद्धतीने स्वच्छता टेंडर..

3) मल्टीयूटीलिटी वाहन खरेदी केली पण वापर काहीच नाही झाला..

4) 2012 पासून करवाढ झाली नाही त्यामुळे 2024 मध्ये अव्वाच्या सव्वा कर वाढ झाली यामुळे अमरावतीकर चांगलेच संतापले होते... त्यांनतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कमी करून आणले पण नंतर निवडणूक संपली की परत नवीन आर्थिक वर्षात करवाढ केली आणि जुन्या दराने करवसुली सुरू झाली...

​ 2026 च्या महापालिका निवडणुकीची राजकीय समीकरणे :

​अमरावती महानगरपालिकेत प्रामुख्याने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांसोबतच स्थानिक पातळीवर युवा स्वाभिमान पार्टी आणि एमआयएमचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. त्यातच आता शिवसेना आणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर दोन नवे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार ) आणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांची भर पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्व पक्ष जर स्वतंत्रपणे / स्वबळावर लढले तर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्ष यांची अमरावती महापालिकेसाठी युती होऊ शकते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके अमरावतीमधील असल्यानं ते स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत भूमिका घेऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्रितपणे की स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाते ते पाहावं लागेल.

अमरावती महापालिका निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026

मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget