Loksabha PM Modi Speech : लोकसभेतील नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाची 16 मिनिटं...
PM Narendra Modi Speech On Manipur Violence : मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरच्या मागे देश ठाम उभा आहे असंही ते म्हणाले. मणिपूरची आजची स्थिती ही काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही मोदींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूरवरील निवेदनाआधीच विरोधकांनी सभात्याग केला होता.
मणिपूरच्या मुद्द्यावरून (No Confidence Motion) विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी मणिपूरची घटना दुर्दैवी असल्याचं सांगितलं. त्याचसोबत संसदेत भारतमातेबद्दल जे काही वक्तव्य करण्यात आलं तेही दुर्दैवी असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली.






















