MNS : बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधल्या भावनिक नात्यावर मनसेचं 'बाळासाहेबांचा राज' नाटक
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामधल्या भावनिक नात्यावर बेतलेलं नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर येत आहे.अनिकेत बंदरकर एन्टरटेन्मेन्ट या संस्थेच्या वतीनं शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचा मुहूर्त साधून बाळासाहेबांचा राज हे दोन अंकी नाटक रंगभूमीवर आणण्यात येत आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग २३ जानेवारी दुपारी साडेचार वाजता प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात होणार आहे. आजवर राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर बेतलेले चित्रपट रुपेरी पड्यावर आले आहेत. पण बाळासाहेब आणि राज यांच्यामधल्या भावनिक नात्याच्या निमित्तानं एक वेगळा प्रयोग मराठी रंगभूमीवर होत आहे. मनसेशी संबंधित असलेले गणेश अरुण कदम हेच या नाटकाचे निर्माते आहेत. तसंच मार्गदर्शक म्हणून मनसेच्या नेत्यांची नावंही श्रेयनामावलीत आहेत. तरीही या नाटकातून एखादा नवा वाद निर्माण होणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या



















