MLA Disqualification Case : मातोश्रीवरील बैठकीतील ठरावावरून प्रभूंना जेठमलानींचे सवाल
MLA Disqualification Case : मातोश्रीवरील बैठकीतील ठरावावरून प्रभूंना जेठमलानींचे सवाल
आमदार अपात्रताप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत सुनील प्रभूंची सलग तिसऱ्या दिवशी उलट तपासणी सुरू आहे. २१ जूनच्या व्हिपबाबत तीन दिवस सवाल करण्यात येत आहेत. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीतल्या ठरवावार दादा भुसे, उदय सामंत आणि संजय राठोड यांनी केलेल्या सह्या खऱ्या नाहीत असा दावा जेठमलानींनी केला. त्यावर आपण मला गुन्हेगार बनवत आहात, मी खोटं कशाला बोलेन असं उत्तर प्रभूंनी दिलं. एकनाथ शिंदे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जात होता त्यामुळे २१ जूनच्या बैठकीत त्यांना पदावरून हटवण्याचा ठरावच होऊ शकला नाही असं जेठमलानी यांनी म्हटलं. तर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यात ठराव पास करण्यात आला असं प्रभूंनी म्हटलंय.
दरम्यान, आजची सुनावणी संपली आहे, आणि आता पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
