(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणी आज नेमकं काय घडलं? सुनावणी 26 डिसेंबरपर्यंतच - अध्यक्ष
MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणी 26 डिसेंबरपर्यंत नेण्यास अध्यक्षांचा नकार, आज नेमकं काय घडलं?
एकीकडे लोकसभेच्या जागांवरून दावे-प्रतिदावे सुरू असतानाच, शिवसेनेच्या सत्तासंघर्षाचीही सुनावणी पार पडली... आमदार अपात्रता सुनावणीची तारीख २६ डिसेंबरपर्यंत नेण्यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिलाय. २२ डिसेंबरपर्यंत ही वेळ नेलीय. मात्र त्यापुढे वेळ देता येणार नाही असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं. अनिल देसाईंनी ४ एप्रिल २०१८ चं अनिल देसाईंचं पत्र अध्यक्षांना सादर केलं. तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला समन्स पाठवून त्याची साक्ष घेण्याची मागणी केली. मात्र ठरलेल्या याचिका व्यतिरिक्त कोणतीही याचिका दाखल करुन घेतल्यास वेळेचे निर्बंध पाळता येणार नाहीत, असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं. दरम्यान आजही सुनील प्रभूंची उलट तपासणी झाली. एकनाथ शिंदेंना पाठवलेलं पत्र ज्या मेलवर पाठवलं तो आयडी शिदेंचा नव्हताच असा दावा करण्यात आला. त्याची पुष्टी करण्यासाठी शिंदे गटाने विधानसभेच्या आमदार परिचय पुस्तिकेतला आयडी प्रभूंना वाचायला लावला.