एक्स्प्लोर
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 19 July 2025 : 12PM : ABP Majha
एकनाथ शिंदे सरकार नाशिकमधील हनी ट्रॅप CD मुळे सत्तेत आले, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्याकडे त्या हनी ट्रॅप प्रकरणाची CD असून, योग्य वेळ आल्यावर ती तिकीट लावून दाखवू, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवरही चर्चा झाली; सुनील तटकरे यांनी 'आम्ही NDA मध्ये आहोत' असे विधान केले, तर छगन भुजबळ यांनी 'तीनही पक्ष एकत्र आहेत' अशी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकावर टीका केली आणि 'ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष' असे म्हटले. विधानसभेच्या निकालावर 'तू तू में में झाली, त्याचा फटका बसला' असे ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबेंना प्रतिआव्हान दिले, तर त्यांच्याविरोधात हिंदी भाषांविरोधात हिंसाचार भडकविल्याचा आणि भाषिक द्वेष पसरविल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वैष्णवी अगवणे प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी आणि उणिवा असल्याचा विधिमंडळाच्या महिला आणि बाल हक्क कल्याण समितीचा अहवाल आहे; वरिष्ठ अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आवश्यकता अहवालात नमूद आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातला, कुणबी जात वैधता प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून वाट अडवली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. कोल्हापुरात रांगोळी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली, तर पंढरपुरात चंद्रभागा नदीत बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला. मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारींचे निवारण झाले आहे.
राजकारण
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















