Dr. Manmohan Vaidya : 'शाळा, कॉलेजमध्ये हिंदुत्वाचे शिक्षण दिलं पाहिजे : डॉ. मनमोहन वैद्य
Dr. Manmohan Vaidya : शाळा, कॉलेजमध्ये हिंदुत्वाचे शिक्षण दिलं पाहिजे असा सूर रायपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत उमटलाय.. रायपूरमध्ये संघाची तीन दिवसीय समन्वय बैठक पार पडली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत शिक्षण, राेजगार, आर्थिक, सामाजिक यासारख्या मुद् द्यांवर विस्ताराने चर्चा झाली. संघाच्या सर्व ३६ संघटनांशी चर्चा केल्यानंतर देशात सकारात्मक बदलावंर काम झाले पाहिजे, यावर एकमत झाले. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये हिंदुत्वाचे शिक्षण दिले जातंय. त्यामुळे भारतातही तसंच शिक्षण दिलं पाहिजे असं संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी म्हटलंय.. तसंच न्यायालयात भारतीय भाषांत निकाल हवेत अशी मागणीही वैद्य यांनी केलीय... भारताची घोषणा हिंदू राष्ट्र अशी होणार का, या प्रश्नाचे उत्तरही मनमोहन वैद्य यांनी दिलंय...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
