Rahul Gandhi : राहुल गांधींसाठी काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन,संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं
काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी कोर्टानं २ वर्षाची शिक्षा सुनावली... आणि काल लोकसभेतून राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली... काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का आहे... दरम्यान, लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय... आज राहुल गांधींची दुपारी १ वाजता पत्रकार परिषद होणार आहे... आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय... दरम्यान काल राहुल गांधींनी देशासाठी लढतोय, कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी जास्त तीव्र होण्याची चिन्हं आहेत.



















