Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut : संजय राऊत राजकारणातील जोकर, बावनकुळेंचा हल्लाबोल
Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut : संजय राऊत राजकारणातील जोकर, बावनकुळेंनी हल्लाबोल केला पाहा काय म्हणाले बावनकुळे?
हे देखील वाचा
Chhagan Bhujbal : भुजबळांकडून राज्यसभेच्या उर्वरित जागेसाठी प्रयत्न, मराठा आरक्षणाच्या झळीपासून वाचण्याचा प्लॅन?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha Election 2024) उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने पक्षात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामागची नेमकी कारण काय आहेत जाणून घेऊयात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. कारण छगन भुजबळ यांनी राज्यसभेचा उमेदवारी आपणास देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली.