Congress On Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देण्यास काँग्रेसचा विरोध
पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देण्यास काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसतर्फे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहीलंय. लोेकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदी नुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही असा दावा काँग्रेसने केलाय. आमदार गायकवाड मतदानासाठी तळोजा जेलमधून निघाले आहेत. त्यांनी कोर्टाकडून परवानगीही घेतलीय.
हे ही वाचा
Sanjay Kute on Ganpat Gaikwad voting : अनेक आमदारांनी तुरुंगात असताना मतदान केलं, गायकवाड 100 टक्के मतदान करणार- संजय कुटे
मला काँग्रेसची कीव येते. ठाकरे गटाचे संजय राऊत यांचीही मला कीव येते. गणपत गायकवाड यांना मतदान करण्याचा अधिकार नाहीत, असं ते सांगत आहेत. आतापर्यंत विधानपरिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांत बऱ्याच आमदारांनी तुरुंगात असताना मतदान केलेलं आहे. हा इतिहास आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांना मतदानाचा अधिकार आहे. तुरुंगात असला तरी लोकप्रतिनिधी मतदान करू शखतो. ते 100 टक्के मतदान करतील, असे भाजपाचे आमदार संजय कुटे म्हणाले.
Ganpat Gaikwad Voting : भाजपाचे गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये, काँग्रेसची मागणी
भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये
काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांनी लिहिले पत्र
लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाहीत
त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नये, काँग्रेसची मागणी