एक्स्प्लोर

Amit Shah Full Speech Manifesto : लाडक्या बहिणीचे 600 वाढवले, जाहिरनामा प्रसिद्ध,UNCUT भाषण

Amit Shah Full Speech Manifesto : लाडक्या बहिणीचे 600 वाढवले, जाहिरनामा प्रसिद्ध,UNCUT भाषण
मुंबई : मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' (BJP election manifesto 2024) असे दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.  भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय? लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल.   शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. १२,००० वरून रु. १५,०००, तसेच एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल.   प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.  वृद्ध पेंशन धारकांना महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल.  महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार-चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील.  येणाऱ्या काळात २५ लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु. १०,००० विद्यावेतन देण्यात येईल.  २५ ठळक मुद्दे 10 राज्यातील ग्रामीण भागात ४५,००० गावांत पांधण रस्ते बांधण्यात येतील.  अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु१५,००० वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल.  वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल.  सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत' व्हिजन महाराष्ट्र @ २०२९० सादर करण्यात येईल.  सन २०२८ पर्यंत महाराष्ट्राला $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविण्याचं लक्ष्य ठेवले आहे.   २५ ठळा मरे 11 महाराष्ट्राला तंत्रज्ञान, उत्पादन आणि नावीन्यपूर्ण (Innovation) संकल्पना क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्यासाठी खालील पावलं उचलण्यात येतील  'मेक इन महाराष्ट्र' धोरण राबवून, महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करण्यात येईल.   महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) राजधानी बनविण्यात येईल. त्यासाठी जागतिक फिनटेक कंपन्यांना आकर्षित करणारं वातावरण निर्माण करण्यात येईल आणि आर्थिक तंत्रज्ञानातील नवीन संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येईल. सोबतच AI संशोधन, नवकल्पना आणि विकासाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल.

राजकारण व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतं
Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतं

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
Kirit Somaiya : महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
Rohit Pawar: फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rahul Narwekar Vidhan Sabha : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी ?Karnataka Marathi Mahamelava: मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारची परवानगी नाहीSharad Pawar Markadwadi :  शरद पवारांसह राहुल गांधीही मारकडवाडी ग्रामस्थांची भेट घेणारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
Kirit Somaiya : महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
Rohit Pawar: फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या
Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
Maharashtra Vs Karnataka: कन्नडिगांची पुन्हा दडपशाही, बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी
बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी, वातावरण पुन्हा तापणार
Embed widget