Rohit Pawar: फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
याबाबत त्यांनी नुकतीच सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यात हातात बॅट घेत ते थेट मैदानात उतरल्याचं दिसलं.
Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आपल्या राजकारणातील भूमिकेवरून कायम चर्चेत असतात तसेच त्यांच्या क्रिकेट प्रेमानंही ते ओळखले जातात. प्रत्येकाला क्रिकेटचं मैदान मारायची चुणुक असते, आणि मैदान बघितलं की हाती बॅट हाती घेण्याची इच्छा होतेच. रोहित पवार यांनी अलीकडेच क्रिकेटच्या मैदानावर चौफेर फलंदाजी करत सर्वांना अवाक केल्याचं दिसलं. एका ट्रॉफीच्या अनावरणप्रसंगी गेलेल्या रोहित पवारांना हातात बॅट घेण्याचा मोह आवरला नाही. फ्रंटफूट, बॅकफूट करत चेंडू बाऊंड्री पलीकडे भिरकावत ते एमसीए कॉर्पोरेट शिल्ड स्पर्धेत ट्रॉफीच्या अनावरण प्रसंगी बॅटींग करण्याचा आनंद घेतला. याबाबत त्यांनी नुकतीच सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यात हातात बॅट घेत ते थेट मैदानात उतरल्याचं दिसलं.
काय लिहिलंय रोहित पवारांनी?
माझा सर्वाधिक आवडीचा खेळ कुठला असेल तर तो अर्थातच क्रिकेट... मैदान बघितलं की हाती बॅट घेण्याची तीव्र इच्छा होते... म्हणूनच #MCA आणि सकाळ माध्यम समुहाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 'एमसीए कॉर्पोरेट शिल्ड' स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण प्रसंगीही बॅटिंग करण्याचा आनंद घेतला...
रोहित पवार
दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते EVM मशीनवर शंका घेत आहेत.बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी माळशिरज तालुक्यातील मारकडवाडी प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांव मविआचे नेते हल्लाबोल करताना दिसताय. राजकीय घटनांना वेग आला आहे.याच मुद्यावरुन शरद पवार गटाच आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली होती. मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारकडून होत असलेली दडपशाही म्हणजे 'दाल मे कुछ काला है' असेच म्हणावे लागेल असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले होते. ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेली मारकडवाडी हे गाव आता देशात चर्चिलं जाऊ लागले असून उद्या शरद पवार हे सकाळी हेलिकॉप्टरने या गावात दाखल होणार आहेत. बॅलेट वर मतदान करण्यात यावे यासाठी या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती.