एक्स्प्लोर

धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली

नाशिकमधील मेळा बसस्थानक एक दुर्दैवी अपघात घडला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहे.

नाशिक : जिल्ह्यातील मेळा बसस्थानकात दुर्दैवी घटना घडली आहे. येथे बसचालकाचे बसवरील (Nashik Bus Accident) नियंत्रण सुटल्याने तीन जण चिरडले गेले आहेत. यात एकाचा दु:खद मृत्यू झाला आहे. या अपघातात इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.  

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या मेळा बसस्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला एक चौकशी कक्ष आहे. याच चौकशी कक्षाच्या आजूबाजूला बस येऊन उभ्या राहतात. येथे 6 डिसेंबरच्या रात्री ठरलेल्या वेळेत एक बस बसस्थानकात येऊन थांबत होती. मात्र याच वेळी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट चौकशी कक्षाला जाऊन धडकली. या दुर्घटनेत बसने एकूण तिघांना चिरडलं. यातील एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. 

बसचालक पोलिसांच्या ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस ही एक महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बस होती. हा अपघात होताच प्रवासी आक्रमक झाले. बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मात्र प्रवासासाठी निघालेल्या एक प्रवाशाला थेट मृत्यूला सामोरे जावे लागल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत महिला मूळची आंध्र प्रदेश राज्यातील.

काही तांत्रिक अडचण आल्यानंतर हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या बसने तीन प्रवाशांना चिरडले यात अंजली थट्टीकोंडा ही महिला प्रवाशी जागीच मृत्युमुखी पडली आहे. ही भाविक महिला आंध्र प्रदेश येथील असल्याची माहिती मिळत आहे. तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालय उपचार सुरू आहेत. बस चालक उमेश भाबड याला मुंबई नाका पोलिसांची ताब्यात घेतले. अपघात नेमका कशामुळे झाले याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिकचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.  

Nashik Bus Accident :

हेही वाचा :

Garud Puran: आत्महत्या, अपघात अशा अकाली मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? गरूड पुराणात सांगितलंय रहस्य, जाणून घ्या..

लेकीच्या लग्नाहून परतताना अपघात, वडिलांसह 6 ठार; दोन दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू

Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Operation Tiger: ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागणार? नाशिकमध्ये सस्पेन्स वाढलेला असतानाच दोन्ही शिवसेनेचे नेते एकत्र, 'त्या' व्हायरल फोटोने भुवया उंचावल्या!
ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागणार? नाशिकमध्ये सस्पेन्स वाढलेला असतानाच दोन्ही शिवसेनेचे नेते एकत्र, 'त्या' व्हायरल फोटोने भुवया उंचावल्या!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Supriya Sule: 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget