Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु, औरंगाबादमध्ये गोंधळ
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी त्यांच्या याच 'शिव संवाद' यात्रेच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक एकाच वेळी होती... यावेळी पोलिसांनी भीमसैनिकांना डीजे थांबवण्याची विनंती केली... दरम्यान भीमसैनिकांनी रोष व्यक्त केला..त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं... त्यामुळे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. तर आदित्य ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त केली. तर मेळावा संपल्यानंतर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न झाला.


















