Parbhani : पाऊस नसल्यानं खरीप पिकं धोक्यात, परभणीतील 52 पैकी केवळ 11 मंडळांना अग्रीम मंजुर
सध्या राज्यातल्या अनेक भागांत पावसानं दडी मारलीये. पावसानं दडी मारल्यानं पिकांचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. परभणी जिल्ह्यात यंदा अत्यंत कमी पर्जन्यमान झाले असुन यामुळे अख्खा खरीप हंगामच धोक्यात आला आहे.जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या ५८% पाऊस व्हायला हवा होता मात्र केवळ ४३% एवढा पाऊस झालाय. त्यातच २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील ५२ पैकी केवळ ११ महसूल मंडळांना अग्रीम मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे इतर 41 महसूल मंडळातील शेतकरी आक्रमक झालेत. याच मुद्द्यावरुन आता शेतकरी बैलगाडा मोर्चा काढणार आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
