Rahul Gandhi Meet Vijay Wakode Family : राहुल गांधींकडून विजय वाकोडेंना श्रद्धांजली अर्पण
आंबेडकरी चळवळीचे दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या निवास स्थानी राहुल गांधी दाखल
परभणी शहारातील राहुलनगर येथील वाकोडे यांच्या निवास स्थानी राहील गांधी दाखल झाले आसून
राहुल गांधी यांच्या सोबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला नाना पटोले विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड नितीन राऊत यांच्या सह काँग्रेस चे मोठे नेते सुध्धा उपस्थित
वाकोडे यांना श्रध्दांजली अर्पण करतील
मोठा पोलीस बंदोबस्त वाकोडे यांच्या निवास स्थाना बाहेर पाहायला मिळतोय
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
परभणी : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज परभणी येथे जाऊन पीडित सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. परभणीतील आंदोलनानंतर पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. मात्र, न्यायालयीन कोठडीत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर दलित समाज संतप्त झाला आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत उत्तर देताना सोमनाथ सूर्यवंशी यांनी मला कुठलीही मारहाण झालेली नाही, असे न्यायाधीशांसमोर सांगितल्याचे फडणवीसांनी म्हटलं होतं. आता, राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर थेट देवेंद्र फडणवीसांनाच लक्ष्य केलं आहे, तसेच फडणवीस खोटं बोलत असल्याचंही ते म्हणाले.