एक्स्प्लोर
Tanaji Sawant : "सत्तांतर होताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?"; तानाजी सावंत यांचं वक्तव्य
वेगवेगळ्या मुद्यावरून चर्चेत असलेले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या मुद्यावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. या सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, असं सावंत यांनी म्हटलंय.
आणखी पाहा


















