Navratri 2022 Nashik : वणीच्या सप्तश्रुंगी गडावरील बोकड बळी बंदी उठवली, उच्च न्यायालयाचा निर्णय
नाशिकमध्ये वणीच्या सप्तश्रुंगी गडावरील बोकड बळी बंदी उठवण्यात आलीय. मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. त्यामुळे येत्या दसऱ्याच्या मुहूर्ताला गेल्या ५ वर्षांपासून बंद असलेली बोकड बळीची प्रथा पुन्हा एकदा सुरु होणार आहे.. आहे. ही प्रथा पुन्हा सुरू व्हावी यासाठी आदिवासी विकास संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बोकड बळी देण्याची परंपरा आहे. मात्र ११ सप्टेंबर २०१६ रोजी दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी देण्याचा विधी सुरू असतांना सुरक्षा रक्षकाकडून अनावधानाने रायफलमधून गोळी सुटली. त्यानंतर ती गोळी भितींवर जाऊन आदळल्याने त्यातील गोळीचे छर्रे हे गर्दीत उडाले. त्यामुळे १२ भाविक जखमी झाले होते.. पोलीस प्रशासनाने दिलेल्या अहवालानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बोकड बळीवर बंदी घातली होती...