Nashik : निवृत्तीनाथ महाराजांच्या भक्त निवासाचे काम निधी अभावी 9 महिन्यांपासून बंद
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 20 तारखेला पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार असल्यानं राज्यभरातुन वारकरी त्रंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत, या भाविकच्या सोयीसाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतून दोन वर्षांपूर्वी भक्त निवास बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र निधी अभावी 9 महिन्यापासून काम बंद पडले आहे, त्यामुळे वारकऱ्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे, प्रसाद योजने अंतर्गत 15 कोटी निधी मंजूर झाला होता, मात्र अर्धवटच निधी उपलब्ध झाला असून भक्त निवासाचे काम रखडले आहे.
निदान पुढच्या वर्षी तरी काम पूर्ण होणार का वारकरीच्या डोक्यावर छत मिळणार का ?असा सवाल उपस्थित होत आहे विशेष म्हणजे लोक वर्गणीतून दगडी पाषणातून मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून दगडी सभा मंडपाचे काम प्रगती पथावर आहे. एकीकडे लोकवर्गणीतून काम होत असताना सरकारी पातळीवर उदासीनता का? असा सवाल उपस्थित होतं आहे. निवृत्ती नाथ पालखी प्रस्थान सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहे, वारकरीशी संवाद साधणार आहेत लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती ला बिनशर्त पाठींबा देणारे राज ठाकरे रखडलेलं बांधकाम काम सुरू करण्यासाठी राज ठाकरे काही मध्यस्थी करणार का याकडे लक्ष लागलें आहे. या संदर्भात मंदिराचे पुजारी जयंत महाराज याच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी























