Nashik Nafed Onion Price : नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरांत वाढ होण्यास सुरुवात
राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा अक्षरश:मेटाकुटीला आलाय. त्यात अनेक पिकांचं मोठ्याप्रमाणात नुकसानही झालंय. अशातच आता नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झालीय. लाल कांद्याला ८०० ते ९०० तर उन्हाळी कांद्याला ९०० ते १००० पर्यंत दर मिळतोय... वाढत्या दरामुळे शेतकऱ्याला जरी दिलासा मिळत असला, तरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेलं नुकसान मोठं असल्यानं शेतकऱ्याच्या पदरी फार काही पडणार नाही.. नुकतंच राज्य सरकारने ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केलंय. त्याचा हातभार मात्र शेतकऱ्याला लागू शकतो. शेतकऱ्याच्या कांदा उत्पादनाला नाफेडकडून जास्तीचा भाव मिळेल अशी अपेक्षा असते. मात्र नाशिक जिल्ह्यात अद्याप तरी कुठल्याही बाजार समितीत नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्याचं दिसत नाहीये.























