(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Harnbari Dam : हरणबारी लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटला...
नाशिकच्या कळवण, सटाणा ,मालेगाव व देवळा परिसरात अत्यल्प पावसामुळे शेतकरी चिंतेत असतांना बागलाणच्या मोसम खोऱ्याला वरदान ठरलेल्या हरणबारी धरण ' ओव्हर फ्लो ' झाले आहे..धरण भरल्याने मोसम खोऱ्यातील शेतकरी आनंदला असून धरणातून मोसम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे..मोसम नदी दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरात समाधान पसरले आहे.यंदा हरणबारी धरण ओव्हरफ्लो होण्यास एक महिन्यापेक्षा जास्त दिवस विलंब झाला आहे.मागील वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच धरण भरले होते..धरण ओसंडून वाहत असल्याने हरणबारी लाभक्षेत्रातील मोसम, काटवन व करंजाडी खोऱ्यातील नदी काठच्या गावाचा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..यंदा मोसम व गिरणा खोऱ्यातील धरणांपैकी ' हरणबारी ' धरण सर्वात अगोदर ओव्हर फ्लो झाले आहे..धरणाची क्षमता ११६६ दशलक्ष घनफूट असून ५६ क्यूसेसने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे..