एक्स्प्लोर
Nashik Winter : नाशिकमध्ये तापमानात घट, कडाक्याच्या थंडीत मुक्या जीवांसाठी वनविभागाकडून उपाय योजना
राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढलाय.. तर अनेक भागांमध्ये पारा घसरतोय. वाढलेल्या थंडीमुळे अनेकजण मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्य्याही कमी झालीय. तर थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या देखील पेटू लागल्यात. राज्यात मुंबईसह,पुणे औरंगाबाद नाशिक, धुळ्यातही पारा घसरलाय.
नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून किमान तापमानात घट होत असून कडाक्याच्या थंडीनं नाशिककर चांगलेच गारठले आहेत, दुसरीकडे मुक्या जीवांनाही थंडीने हुडहुडी भरत असून नाशिक पश्चिम वनविभागाच्या पक्षी वन्यजीव उपचार केंद्रातील पक्षांचा थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने इको फाउंडेशनच्या पुढाकाराने ईथे हिटर लावण्यात आले.
आणखी पाहा























