(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Farmers Loss : Winter Session मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा होण्याची शक्यता
Nashik Farmers Loss : Winter Session मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा होण्याची शक्यता
नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अहवाल आज सरकारला सादर होणार. विधिमंडळच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अहवाल होणार सादर. कृषी विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे आकडेवारी सादर होणार. 26 नोव्हेंबर रोजी आलेल्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील शेती पिकांचे शेकडो कोटींचे झालेय नुकसान. 35 ते 40 हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज. पालकमंत्री दादा भुसे आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे दिले होते आदेश. 15 तालुक्यातील किती गावातील, किती क्षेत्रावरील शेतकऱ्यांना फटका बसला याची आकडेवारी समोर येणार. हिवाळी अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्याची शक्यता. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाल्याचा अंदाज.