Ashok Chavan : मराठा आंदोलकांकडून अशोक चव्हाणांना नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात प्रवेशबंदी!
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची धग मात्र अजूनही कायम आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना हाकलून दिलं. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगान ते या गावात मतदारांच्या भेटी-गाठी साठी आले होते. 'एक मराठा-लाख मराठा' सह विविध घोषणा देत संताप व्यक्त करत होते. गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. शेकडो जणांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला. नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध पक्षाच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता असून प्रचार काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
