Samruddhi Highway : 'समृद्धी'वरील सुरक्षित प्रवासासाठी काय आहे इनोव्हेटिव्ह मॉडेल?
हायवे हिप्नोसिस आणि टायर फुटल्यानं होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन हे मॉडेल तयार करण्यात आलं आहे. त्यानुसार समृद्धी महामार्गावर दीडशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर दर दोन किलोमीटरवर वाहनांची गती ताशी वीस किलोमीटरनं कमी करत आणायची. तसंच एका विशिष्ट अंतरानंतर समृद्धी महामार्गावर अर्ध्या किलोमीटरचा पाण्याचा भाग तयार करायचा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्यानं वाहनांची गती कमी केल्यामुळं हायवे हिप्नोसिसचा परिणाम होणार नाही, तर अर्ध्या किलोमीटर पाण्याचा भागातून वाहन गेल्यानं तापलेल्या टायर्सचं योग्य कुलिंग होईल आणि फुटणार नाहीत. या दोन खबरदारी घेतल्यास अपघात टळतील असा भौतिकशास्त्र विभागाचा दावा आहे.























