एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur : शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उद्यापासून नागपुरात अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असून तुपकर आमरण उपोषण करणार आहे. मात्र, नागपुरात कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश असल्यामुळे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारत तुपकर यांना नोटीस बजावली आहे.. त्यामुळे आंदोलनावर ठाम असलेल्या स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. काहीही झाले तरी आंदोलन करणारच आणि जीव गेला तरी आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आहे... सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा... या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, पीक विमा कंपन्यांची अरेरावी थांबावी, सोयाबीन आणि कापूस पिकाला योग्य भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात असून सर्वच राजकीय पक्ष मोजक्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवाज उचलतो मात्र मोठ्या संख्येने असलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे त्यांचा दुर्लक्ष असल्याचा आरोपही तुपकर यांनी केला आहे. नागपूरच्या संविधान चौकावर नियोजित असलेल्या या आंदोलनासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पेंडॉल उभारला असून पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत रविकांत तुपकर यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे उपराजधानी नागपुरात उद्या पासून होणारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चा आंदोलन लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
नागपूर
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
Devendra Fadnavis Nomination : देवेंद्र फडणवीस विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार
Vijay Wadettiwar Nagpur : काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल; अंतिम यादी आज निश्चित - वडेट्टीवार
Vishva Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून राज्यात 25 हून अधिक ठिकाणी संत संमेलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement