एक्स्प्लोर

Pench Tiger Reserve : पेंच व्याघ्र प्रकल्प राज्यातील पहिला प्लास्टिक मुक्त प्रकल्प ABP Majha

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प राज्यातील पहिला प्लास्टिक मुक्त व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य झाला आहे... पर्यटकांकडून जंगलात नेल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि खास करून प्लास्टिक बॉटल्समुळे होणारा प्रदूषण टाळण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पर्यटकांच्या प्लास्टिक बॉटल्सवर पेंच मध्ये पूर्णपणे बंदी घातली आहे... पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रत्येक दारावर रोज शेकडोच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकाकडून त्यांच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल्स काढून घेतल्या जातात आणि पेंच च्या व्यवस्थापनाकडून काचेच्या बॉटल्समध्ये शुद्ध आणि थंड पिण्याचा पाणी उपलब्ध करून दिला जात आहे... विशेष म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रत्येक गेटच्या जवळ पर्यटकांना मुबलक शुद्ध व थंड पाणी काचेचे बॉटल्स मध्ये देण्यासाठी छोटे कारखाने स्थापन करण्यात आले आहे... या छोट्या कारखान्यांमुळे स्थानिक आदिवासी तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे तर दुसऱ्या बाजूला पर्यटकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत आहे.... सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या उपक्रमामुळे जंगलात होणाऱ्या प्लास्टिकच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे...

हे व्हिडिओ देखील पाहा

Digitally signed 7 12, 8A : डिजीटल सातबारा काढा मोबाईलमध्ये! असे करा डाउनलोड ABP Majha

येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतीच्या कामामध्ये गुंतणार आहे. यासोबतच शेतकऱ्याला पिक विमा किंवा पीक कर्ज काढण्यासाठी सातबाराची गरज भासते. तर आजच्या या व्हिडिओतून आपण ऑनलाईन सातबारा घरबसल्या कसा काढायचा याचीच माहिती जाणून घेणार आहोत. 

1) सर्वात आधी तुम्हाला गुगल वरती डिजिटल साइन सातबारा असं टाईप करायचं आहे. 
2) त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारची महाभूमिलेख ही वेबसाईट आली असेल. आता तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. 
3) त्यानंतर तुमच्यासमोर एक होम स्क्रीन आली असेल जर तुम्ही या वेबसाईट वरती आधीच लॉगिन केले असेल तर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. 
4) आणि जर तुम्ही पहिल्यांदा सातबारा काढत असाल तर तुम्हाला खाली नवीन नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. 
5) त्यासाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचा आहे. 
6) आता तुमच्या समोर एक फॉर्म आला असेल तो फॉर्म पूर्णपण भरून घ्या. 
7) डिजीटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारला 15 रुपये पे करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला काही तुमचं अकाउंट रिचार्ज करायचं आहे. 
8) खाली असलेल्या रिचार्ज या ऑप्शनवर क्लिक करा.
09)त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यावर 15 रुपये पासून ते 1000 रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता.
10) आता तुम्हाला जेवढी रक्कम जमा करायची आहे ते टाका.
11) त्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट करण्यासाठी अनेक ऑप्शन आले असतील. जसे की. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट  बँकिंग, युपीआय..  आता प्रत्येक जण फोनमध्ये युपीआय वापरतो म्हणून आपण युपीआयद्वारे पेमेंट करुयात...
12) त्यानंतर जर तुमच्याकडं युपीआय आयडी असेल तर ते टाका किंवा QR कोड स्कॅन करून देखील तुम्ही पेमेंट करू शकता. 
13) पेमेंट झाल्यावर तुमच्या स्क्रिनवर पेमेंट सक्सेसफुल असं आलं असेल...
14) त्यानंतर आता तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे. आणि खाली तुमचा गट क्रमांक टाकायचं आणि डाऊनलोड बटनवर क्लिक करायचं आहे.
15) त्यानंतर  वरची तुम्हाला एक नोटीफिकेशन पाठवण्यात येईल. त्यात सांगितलं आहे. की प्रत्येक डिजीटल  सातबारा काढण्यासाठी 15ल रुपये मोजावे द्यावे लागतील. त्यावर ओके करा. 
16) आता तुमचा डिजीटल सातबारा डाऊनलोड झाला असेल...

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget