Nagpur : अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती, गडकरींची पशु मत्स्य विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना वॉर्निंग
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. नागपुरात त्यांच्या याच स्वभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करुन दाखवा. टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, अशा शब्दांत नितीन गडकरींनी पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना तंबी दिली आहे. नागपुरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदारही उपस्थित होते. आता नितीन गडकरींच्या वॉर्निंगनंतरही पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक कामाला लागणार का? हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.























