Vidarbha Protest : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा
Nagpur Vidarbha Activists Protest : ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आज विदर्भवादी कार्यकर्त्यांनी (Vidarbha Activists) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. नागपुरात विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर यांच्या घराबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर काही विदर्भवादी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फडणवीस यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विदर्भावादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं येथे पाहायला मिळत आहे.






















