एक्स्प्लोर
Nagpur : कोराडीत औष्णिक वीज केंद्रात 2 नवे संच उभारण्यास विरोध : ABP Majha
महाजेनकोने कोराडी येथे आधीच कार्यरत असलेल्या औष्णिक वीज केंद्रात प्रत्येकी 660 मेगावॉट क्षमतेचे दोन नवीन संच उभारण्याची तयारी सुरू केलीये. त्यासाठी 29 मे ला जनसुनावणी होणार आहे... मात्र कोराडी परिसरात आधीच औष्णिक वीज केंद्र कार्यरत असून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि वाढलेल्या तापमानाची समस्या निर्माण झालीये... त्यामुळे महाजेनकोने प्रस्तावित असलेले दोन्ही संच कोराडी येथे स्थापन न करता इतरत्र स्थापन करावे अशी मागणी जोर धरू लागलीये. दरम्यान काँग्रेस पक्षानेही कोराडी येथे औष्णिक वीज केंद्राचे नवीन दोन संच स्थापन करण्याला विरोध दर्शविलाय... तसंच 29 मेच्या जनसुनावणीलाही विरोध केलाय..
आणखी पाहा























