Nagpur : ज्वाला धोटे यांच्य नेतृत्त्वाखाली गंगा जमुना या वारंगणांच्या वस्तीत आज पुन्हा आंदोलन
नागपूरातील गंगा जमुना ही वारंगणांची वस्ती सुरु करावी यासाठी आज पुन्हा आंदोलन झालं. या आंदोलनाच्या वेळी आंदोलक आणि स्थानिक नागरिक आमनेसामने आले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गंगाजमुना वस्तीत अंमली पदार्थांच्या विक्रीसह अनेक अवैध धंदे चालतात, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलिसांनी ही वस्ती सील केली आहे. मात्र, सील केल्यानं महिलांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे वस्ती पुन्हा खुली करण्याच्या मागणीसाठी वारंगणांनी राष्ट्र्वादीच्या नेत्या ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं. तर, या वस्तीत चालणाऱ्या देहव्यापाराला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक धरणे आंदोलन करत होते. यावेळी दोन्ही आंदोलकांचे गट आमनेसामने आले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.























