Nagpur : गोव्याच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं आज नागपुरात जोरदार स्वागत होणार ABP Majha
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं आज नागपुरात जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपनं उत्तम कामगिरी करत ४ राज्यांमध्ये आपली सत्ता कायम ठेवली आहे.. यापैकी गोव्यात फडणवीस निवडणूक प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपनं एकहाती विजय खेचून आणला त्यामुळे भाजप नेत्यांकडून सध्या त्यांचं जोरदार कौतुक केलं जातंय.. गोव्यातील या विजयानंतर फडणवीस आज पहिल्यांदा नागपुरात येत आहेत .. यावेळी विमानतळ ते नितीन गडकरीचं घर अशी रॅली काढून जल्लोष साजरा केला जाणार आहे.. फडणवीसांच्या स्वागतासाठी विमानतळावर ढोल-तशांचा गजर करण्यात येतोय. भाजप कार्यकर्त्यांनी ही नागपूर विमानतळावर मोठी गर्दी केली आहे..























