Nagpur Congress Maharally : काँग्रेसचा स्थापना दिवस, नागपुरात सभेसाठी एकूण 3 स्टेज उभारले ABP Majha
Nagpur Congress Maharally : काँग्रेसचा स्थापना दिवस, नागपुरात सभेसाठी एकूण 3 स्टेज उभारले ABP Majha
आज काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. यासाठी भलं मोठं स्टेज उभारण्यात आलंय. या सभेसाठी एकूण तीन स्टेज उभारण्यात आलेत. तसंच ६२० खुर्च्या ठेवण्यात आल्यात.
नागपूर : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल फुंकण्यासाठी दीक्षाभूमी व संघभूमी असलेल्या उपराजधानीत गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहे. काँग्रेस (Congress) स्थापना दिनानिमित्त 'है तयार हम' सभेचं आयोजन करण्यात आले आहे. सोनिया गांधी(Soniya Gandhi) , राहुल गांधी (Rahul Gandhi) , प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) उपस्थित राहाणार आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने 28 डिसेंबर ला नागपुरात काँग्रेसची 'है तयार हम' अशी महारॅली (सभा) होणार आहे. त्यासाठी उमरेड रोडवरील बहादुरा परिसरात 40 एकर क्षेत्रावर विशेष मैदान तयार करण्यात आला आहे.
सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खडगे या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला दिशा मिळेल असा मत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. विदर्भाच्या भूमीने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी आणि प्रभू श्रीरामाचा रामटेक या पावनभूमीतून आशीर्वाद घेऊन काँग्रेस नेतृत्व देशातून भाजप सरकारला उलथवून लावेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. 1920 मध्ये काँग्रेसचे खास अधिवेशन नागपुरात पार पडले होते.. त्याच्या 103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे मतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्राची आणि त्यातल्या त्यात नागपूरची निवड का केली? काँग्रेसची स्थापना झालेली मुंबई किंवा देशाची राजधानी असलेले दिल्ली या ऐवजी ही सभा नागपुरात का? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.