(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Blast Threat Case : निनावी पत्राद्वारे धमकी देणारा महापारेषणचा अभियंता ताब्यात ABP Majha
Nagpur Blast Threat Case : रेशीमबाग परिसरातील मैदान उडवण्याच्या धमकी प्रकरणी एकाला अटक ABP Majha
25 नोव्हेंबर रोजी नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये एक निनावी पत्र मिळाले होते. असा निनावी पत्र मिळाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली.सक्करदरा पोलीस स्टेशन चा विशेष पथक स्थापन करून गेले अनेक दिवस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी नागपूरच्या झिरो माइल येथील पोस्ट ऑफिस मध्ये तो निनावी पत्र पेटीत टाकणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि त्या व्यक्तीने हो हे धमकीचे निनावी पत्र मीच लिहिले आहे असे कबूल केले आहे.सध्या पोलीस त्या व्यक्तीची सखोल चौकशी करत असून मानसिक स्थिती योग्य नसल्यामुळे मी असे केल्याचे तो चौकशीत सांगत असल्याची माहिती आहे.दरम्यान ज्या दिवशी स्फोट घडवू असे त्या धमकीचे पत्रात लिहिण्यात आले होते.. त्याच दिवशी भट सभाग्रह मध्ये महापारेषण चे एक कार्यक्रम होणार होता. तो कार्यक्रम होऊ द्यायचे नाही म्हणून ही निनावी धमकी देण्यात आली होती का असा संशय पोलिसांना आहे आणि पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.