Nagpur Hit and Run case : पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी सुनेनंच दिल्याचं तपासात समोर
नागपूच्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजी नगर परिसरात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आलीये..
पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्याची सुपारी ही त्यांच्याच सूनेने दिल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आलीये..
वाहनचालक सार्थक बागडेला सुपारी दिल्याची माहिती
अर्चना पुट्टेवार यांनीच आपल्या 82 वर्षीय सासर्यांच्या हत्येची सुपारी कुटुंबातील ड्रायव्हर सार्थक बागडेचे माध्यमातून दिल्याचं पोलीस तपासात पुढे आलय..
22 मे रोजी एका भरधाव कारने धडक दिली होती. त्यामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला सर्वांना तो एक रस्त्यावर घडणारे हीट अँड रनचा प्रकार वाटला होता. मात्र नंतर पोलिसांना या प्रकरणात काही गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी केलेल्या तपासात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना लागलेली कारची धडक सुनियोजित पद्धतीने घडविलेला अपघात होता आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्याच्या उद्दिष्टाने तो अपघात घडवण्यात आला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे